ह.भ.प. गणेश महाराज भागुजी फड वारकरी आश्रम ट्रस्ट आळंदी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर।

आळंदी: पोलीसनामा आॅनलाईन

ह.भ.प. गणेश महाराज भागुजी फड वारकरी आश्रम ट्रस्ट, आळंदी येथे मागील 9 वर्षांपासून वार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही खादगांव सह ( ता. गंगाखेड, जि. परभणी) राज्यातील भाविकांच्या सहकार्यातून  9 एप्रिल पासून 15 एप्रिलपर्यंत दहाव्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहामध्ये काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथाभजन, भावार्थ रामायण, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर तसेच विशिष्ट वेळेत रामकृष्णहरी नामजप होणार आहे.

भाविकांनी हरिनाम सप्ताहात सहभागी होवून नामजप यज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताहाचे आयोजक, ट्रस्टचे संस्थापक ह.भ.प. गणेश महाराज भागूजी फड यांनी केले आहे.

ज्ञानेश्वर  माऊली वारकरी आश्रम ट्रस्ट आळंदी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन