टेम्पो-मोटार अपघातात 1 ठार 3 गंभीर जखमी

रांजणगाव : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर राजणगाव मार्गावरील कोंढापूर येथे झालेल्या टेम्पो आणि मोटार अपघातात एकजण जागीच मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (मंगळवार) सायंकाळी झाला.

अपघाताची माहिती मिळताच रांजगणगाव पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे बघ्यांनी गर्दी केल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. अपघातातील जखमी आणि मृत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.