डीएसके पुढील दोन दिवस दीनानाथमध्येच : न्यायालयाचा आदेश

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

डीएसके यांना ससूनच्या मेडिकल बोर्डकडे आज (मंगळवार) तपासणीसाठी नेण्यात आले होते. डीएसके यांच्या वैद्यकीय तपासणीवरील बैठक संपली असून दोन दिवस म्हणजेच पुढील 48 तासांसाठी डीएसके यांना ससूनमध्येच ठेवणार होते, मात्र डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयात त्यांना कोणत्या रुग्नालयातून उपचार घ्यावेत याची मुभा देण्यात यावी असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पुढील दोन दिवस दीनानाथ रुग्णालयात ठेवण्यास परवानगी दिली आहे. दिनांक २३ रोजी पुन्हा डीएसकेंची वैद्यकीय चाचणी होणार असून त्यांच्या बाबतचा पुढील निर्णय २३ तारखेला होणार आहे.

पुढचे 48 तासांनंतर पुन्हा तब्बेतीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करायचे की पुन्हा खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु ठेवायचे याचा निर्णय न्यायालय घेईल. आज सकाळी आठ वाजता डीएसके यांना ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय तज्ज्ञ (HOD) तपासणी करणार आली. यात दहा तज्ज्ञ डॉक्टराचा समावेश होता.

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिल्ली येथून अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना  23 फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती.  त्याची रवानगी पोलीस कोठडी करण्यात आली. पोलीस कोठडीत त्यांना पाहटेच्या सुमारास चक्कर आल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ससून रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले होते.