डी. एस. कुलकर्णी यांची पुणे एसआयटीकडून चौकशी सुरु

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन

गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्य नायालयाच्या आदेशानुसार डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. पाच दिवस चालणा-या या चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर केला जाणार आहे. आज (बुधवार) झालेल्या चौकशी दरम्यान डी.एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांचे वकिलही उपस्थित होते.

डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. न्यायालयाने त्यांना 50 कोटी रूपये जमा करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली. परंतू त्यांनी पैसे न भरल्याने न्यायालयाने कानउघडनी करुन कुलकर्णी दांमपत्याची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ‘एसआयटी’कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत डी. एस. कुलकर्णी यांची आणि हेमंती कुलकर्णी यांची चौकशी केली जाणार आहे. यावेळी बुधवारी झालेल्या चौकशीत स्वत: डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांचे वकिलही उपस्थित होते.

डीएसके यांच्या विरोधात आत्तापर्यंत ४ हजार २० तक्रारी आल्या असून, यामध्ये २८० कोटी ६८ लाख ५६ हजार ५८८ची फसवुणक झाल्याची तक्रार आहे. डीएस कुलकर्णी यांच्या प्रॉपर्टी सिल करून त्यांच्या लिलावासंदर्भात नोव्हेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिलेले असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.