तंबाखूमुळे आठवड्याला 18 हजार बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

अमेरिकन कॅन्सर सोसायटी व अमेरिकेतील व्हायटल स्ट्रॅटेजीजने बनवलेल्या टोबॅको अ‍ॅटलासमध्ये भारतात दरवर्षी तंबाखू पासून होणाऱ्या मृत्यूचे आकडे जाहीर केले आहेत. सर्वेनुसार युवा वर्ग व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडला आहे असे चित्र आहे. या सर्वेतली माहिती गंभीर असून यावर उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारतात 10 ते 14 वर्षे वयोगटातील सहा लाख 25 हजार मुले दररोज सिगारेट ओढतात. तर दरवर्षी भारतात तंबाखूशी संबंधित आजारांनी 9 लाख 32 हजार 600 पेक्षा जास्त लोकांचा बळी जातो. हे प्रमाण आठवड्याला 17,887 एवढे आहे, असे अमेरिकन कॅन्सर सोसायटी व अमेरिकेतील व्हायटल स्ट्रॅटेजीजने बनवलेल्या टोबॅको अ‍ॅटलासमध्ये म्हटले आहे.