तरूणाच्या छातीवर, चेहर्‍यावर कटर ब्लेडने सपासप वार

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

चोरीच्या उद्देशाने तरूणाच्या शरिरावर ठिकठिकाणी कटर ब्लेडने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील न्यु सागर बिल्डींगमधील दुसर्‍या मजल्यावर घडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a4566bf-ca1f-11e8-93fe-63a4c10f2aab’]

शांतु सलीम शेख (25, धंदा:- भाजी विक्री, रा. 1035, न्यु सागर बिल्डींग, बुधवार पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.  याप्रकरणी अजिंक्य गंगाधर ओव्हाळ (29, रा. स्वामी समर्थ बिल्डींग, वनाझ कॉर्नर, कोथरूड), आदित्य अश्‍विन डाके (20, रा. संगम चौक, कोथरूड) आणि आदित्य गणेश आदमाने (21, रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेख यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून ते बुधवार पेठेतील न्यु सागर बिल्डींगमध्ये रहावयास आहेत. शनिवारी पहाटे अडीच वाजता शेख यांचा मित्र त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घराखाली आला होता. त्याला भेटण्यासाठी शेख हे घराखाली आले होते. मित्राची भेट झाल्यानंतर घरी परत जाताना शेख यांना आरोपींनी अडविले आणि त्यांच्या पॅन्टच्या मागील खिशातील पाकिट काढुन घेण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला.

[amazon_link asins=’B00C32G04S,B06X6FZ3NK,B00WQO2DGC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9130eeb8-ca1f-11e8-ae40-a917718ce5c4′]

त्यावेळी शेख यांनी त्यांना प्रतिकार केला. आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या कटर ब्लेडने शेख यांच्या छातीवर, चेहर्‍यावर, ओठावर, हनुवटीवर, गालावर आणि कानावर सपासप वार करून त्यांना रक्‍तभंबाळ केले. दरम्यान, रात्र गस्तीवर असलेले पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तात्काळ आरोपींना अटक केली. दरम्यान, शेख यांना उपचारासाठी ससुन रूग्णालयात पाठविण्यात आले. शेख यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलिस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

पिंपरी : रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगारास अटक

आरोपींनी चोरीच्या उद्देशाने शेख यांच्यावर प्राणघातक हल्‍ला केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्‍न झाले आहे. आरोपींनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिस तपास करीत आहेत. शेख यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.