तालेरा रूग्णालयात प्रसुती आॅपरेशन थिटरमध्ये शाॅर्टसर्कीट

चिंचवडः आॅनलाईन पोलीसनामा
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तालेरा रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे पोटात कळा येऊ लागल्या. त्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी या महिलेला ऑपरेशन थिटरमध्ये घेवून जाण्याची तयारी सुरु केली. दुपारी अडीचच्या सुमारास ऑपरेशन थिटरमध्ये डॉक्‍टरांनी वीजेचे स्वीच चालू केले असता अचानक शॉटसर्कीट झाले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय उपकरणाच्या सहायाने करण्यात येणार होती. मात्र, शॉर्टसर्किटमुळे विद्युत उपकरणे बंद पडली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला तत्काळ वायसीएम रुग्णालयात हलविले. वायसीएम रुग्णालयात ऑफरेशन थिटरमध्ये महिलेवर सिझेरीन शस्त्रक्रिया करण्यात आली.

यापुर्वी देखील या रुग्णालयाच्या ऑफरेशन थिएटरमधील विविध कामांची दुरुस्ती करण्यासाठी ते एक महिना बंद ठेवले होते. रुग्णालयातील ऑफरेशन थिटरमध्ये अचानक झालेल्या शॉटसर्कीटची महापालिका विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्याची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे समजते.

तालेरा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विना गंभीर म्हणाल्या की, गरोदर महिलेची सिझेरीन शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलेला ऑफरेशन थिटरमध्ये घेवून जाण्यापुर्वीच ऑफरेशन थिटरमध्ये शॉर्टसर्कीटची घटना घडली. परंतू, या घटनेत त्या महिलेला कुठलीही इजा झालेली नाही.

त्या महिलेवर वायसीएम रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बाळंतमाता आणि बाळ सुखरुप असल्याचे डॉ. मनोज देशमुख यांनी सांगितले आहे.