तृतीयपंथी सोनालीची माफी मागून माॅलमध्ये दिला सन्मानाने प्रवेश

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन
पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलने ज्या तृतीयपंथी सोनालीला काही दिवसांपुर्वी प्रवेश नाकारला होता.  त्याच मॉलने आज तृतीयपंथी सोनालीची जाहीर माफी मागितली आणि तिचे स्वागत करत तिला मॉलमध्ये सन्मानाने प्रवेश दिला.

तृतीयपंथी सोनालीची माफी मागून माॅलमध्ये दिला सन्मानाने प्रवेश

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सोनालीने प्रवेश केला. यावेळी फिनीक्स मॉलचे संचालक राजीव मल्ला यांनी सोनालीची माफी मागितली. यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, मनोज पाचपुते, नारायण गलांडे, राकेश कामठे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सोनाली म्हणाली, समाजाने आम्हाला स्वीकारावे आणि प्रेम द्यावे इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने आम्ही मॉल प्रशासनाशी चर्चा केली असून त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे तिने यावेळी सांगितले.

अधिक वाचा-  https://goo.gl/kxitcn