थंडपाण्याच्या कारणावरून बहिणीवर चाकूने वार

वर्धा : पोलिसनामा ऑनलाईन

हिंगणघाट  येथे  थंडपाण्याच्या कारणावरून भावाने लहान बहिनीला चाकू मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी झाल्याची माहिती मिळाली आहे.

हिंगणघाट येथील तुकडोजी वॉर्ड येथे ही घटना घडली. स्नेहा मिलिंद भगत (२२) असे जखमी मुलीचे नाव आहे. भाऊ दिक्षीत भगत हा शनिवारी रात्री उशिरा घरी आला असताना, त्यानी थंड पाणी घेण्यासाठी फ्रिज उघडला. परंतु थंड पाणी नसल्याने तो नाराज झाला आणि त्याने चिडून एक भांडे खाली आदळले. भांडे का आदळले याबाबत स्रेहाने दिक्षीतला विचारले असता त्याने स्वयंपाक घरातील चाकूने तिला मारहाण केली ज्यामध्ये स्नेहा जखमी झाली आहे.

या प्रकरणी स्रेहाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दिक्षीत भगत याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरु असल्ल्याची माहिती मिळाली आहे