दारुबंदीसाठी अंगावर दारु ओतून प्रशासनाचा निषेध

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन

शिरुर तालुक्यातील सर्व गावांमध्ये दारु बंदी करण्यात यावी यासाठी एका इसमाने स्वत:च्या अंगावर दारु ओतून प्रशासनाचा निषेध केला. शिरुर तहसील कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे अधिका-यांमध्ये खळबळ उडाली.

संजय पाचंगे असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी यापूर्वी देखील आपला कुर्ता आणि पायजमा तहसीलदरांना भेट देऊन अनोखे आंदोलन केले होते.

शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्या कार्यालयातच हां प्रकार घड़ल्यांने सर्वत्र खळबळ उडाली. गावात कायम स्वरूपी दारुबंदी व्हावी म्हणून शिरुर तालुक्यातील तब्बल 91 ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत. मागील दोन वर्षा पासून वेगवेगळ्या प्रकारे निवेदन देऊनही जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अखेर ह्या पद्धतीने आंदोलन कराव लागल्याच आंदोलक संजय पाचंगे यांनी सांगीतल. विशेष म्हणजे या पूर्वीही पाचंगे यांनी आपला कुर्ता आणि पायजामा तहसीलदारांना भेट देऊन दारु बंदीच्या मागणीकड़े लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.