दीपिका पदुकोण ठरली इन्स्टाग्रामची ‘मस्तानी’

क्रिकेटर विराट कोहलीचे ‘मोस्ट एंगेज्ड अकाऊंट’

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका पदुकोण ही अभिनेत्री आता इन्स्टाग्राम शर्यतीतही जिंकली आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या अकाऊंटचे अवॉर्ड दीपिका पदुकोणने मिळवले आहे. ‘Most Followed Account’ हा पुरस्कार दीपिकाला जाहीर झाला आहे. तर क्रिकेटर विराट कोहलीला ‘मोस्ट एंगेज्ड अकाऊंट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामने पहिल्यांदाच भारतात अशा प्रकारच्या बक्षीसांची घोषणा केली आहे.

 

विराट कोहलीचे फॉलोअर्स १ कोटी ९० लाखांच्या वर आहेत. सर्वाधिक एंगेज्ड अकाउंटचा पुरस्कार त्याच्या अकाऊंटला जाहीर झाला आहे. २०१७ या वर्षात लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊसच त्याच्या अकाऊंटवर पडला आहे. तर आपली देसी गर्ल प्रियांका चोप्राला मागे टाकत दीपिका पदुकोण ही इन्स्टाग्रामची क्वीन ठरली आहे. दीपिकाचे दोन कोटी २० लाखांच्या वर फॉलोअर्स मिळवले आहेत. प्रियंका चोप्राचे फॉलोअर्स दोन कोटींच्या घरात आहेत. इन्स्टाग्रामवरच्या टॉप थ्री अभिनेत्रींमध्ये आलिया भट ही अभिनेत्री तिसरी आहे. आलियाचे एक कोटी ९० लाखांच्या घरात तिचे फॉलोअर्स आहेत.

Early morning training is Bliss! ?? #ComeOutAndPlay

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on Mar 18, 2018 at 7:34pm PDT

”माझ्या चाहत्यांसोबत मी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जोडली जाते आहे यासारखी आनंदाची बाब माझ्यासाठी दुसरी नाही,”अशी प्रतिक्रिया दीपिका पदुकोणने दिली आहे. तसेच माझ्या चाहत्यांनी माझ्या इन्स्टा अकाऊंटला दिलेल्या प्रतिसादाबाबत मी त्यांची आभारी आहे असेही दीपिकाने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिले आहे.