’या’ कारणामुळे पायांना येते दुर्गंधी, ‘हे’ 5 उपाय करून समस्या करा दूर,जाणून घ्या

तुम्ही घातलेले शूज काढल्यानंतर चारचौघात घाणेरडी दुर्गंधी येत असेल तर खूप विचित्र वाटू शकतं. ही समस्या उन्हाळा तसेच पावसाळ्यातही जाणवते. पायच्या तळव्यांना येणार्‍या घामामुळे हे होत असते. या घामामुळे दुर्गंधी निर्माण होते. बुटांना येणार्‍या दुर्गंधीमागील कारण आणि त्यावरील उपाय जाणून घेवूयात.

हे आहे कारण
घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. घाम त्वचेवरील रोमछिद्रांमधून येतो. टेन्शन, स्ट्रेस यामुळेही घाम येतो. या समस्येमुळे सतत घाम आणि दुर्गंधी येण्याची स्थिती उद्भवते.

हे उपाय करा
1 कोमट पाण्यात मीठ मिक्स करा आणि त्यात 15 ते 20 मिनिटासाठी पाय टाकून ठेवा. दुर्गंधी दूर होईल, तसेच थकवाही दूर होईल.

2 पाण्यात व्हिनेगर टाका. या पाण्यात 30 मिनिटांसाठी पाय टाकून ठेवावे. यामुळे दुर्गंधी दूर होईल. बॅक्टेरियाच्या संक्रमणपासून बचाव होईल. एक आठवडा हा उपाय करा.

3 रोज अंघोळ झाल्यानंतर पायांना पावडर लावा.

4 टी सॉक्सचा वापर करा. टी सॉक्स पाण्यात घालून त्यात पाय बुडवून बसा.

5 शक्य असेल तर आलटून पाटलून शूज वापरा. वापरून झाल्यानंतर ते धुवायला टाका