दुसरे लग्न करायचे आहे… या देशात जा.

संयुक्त अरब अमीरात: जगातील काही देशांमध्ये दोन विवाह करण्यास कायद्याने बंदी आहे. पण ते काही देश आहेत जे तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे प्रोत्साहन म्हणजे दुसरे लग्न करणाऱ्या तरुणांना वेगवेगळे भत्तेदेखील देतात. त्यातील एक देश म्हणजे संयुक्त अरब अमीरात (UAE).

खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमीरातमध्ये अविवाहित तरुणींची संख्या वाढत आहे यामुळे तेथील राज्यकर्ते चिंतेत आहेत.
या देशाचे पायाभूत विकास मंत्री डॉ. अब्दुल्ला बेलहैफ अल नुईमी यांनी तरुणांना दुसऱ्या लग्नाला प्रोत्साहित करण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. यासंदर्भातील घोषणा फेडरल नॅशनल कॉन्सिलमाच्या बैठकीमध्ये केली.

घोषणा करताना ते म्हणले की,दोन पत्नी असणाऱ्या सर्व लोकांना शेख झायद हाऊसिंग कार्यक्रमांतर्गत घरभाडे भत्ता दिला जाईल. हा भत्ता दुसऱ्या पत्नीच्या घर भाड्यासाठी असेल. म्हणजेच एक पत्नी असणाऱ्या लोकांना मिळणाऱ्या घर भाडे भत्तापेक्षा अतिरिक्त असेल. दुसऱ्या पत्नीची जगण्याची व्यवस्था ही पहिल्या पत्नीप्रमाणेच असावी. घरभाडे भत्ता मिळाल्यामुळे लोक दुसऱ्या लग्नासाठी प्रोत्साहित होतील. त्यामुळे अविवाहित तरुणींची संख्या घटण्यास मदत होईल.

संयुक्त अरब अमीरातमध्ये तरुणींची संख्या वाढत आहे, यावर फेडरल नॅशनल कॉन्सिलचे सदस्य चिंतेत आहेत. त्यातील काही सदस्यांच्या मते लोक दुसरे लग्न न करून देशावरील आर्थिक बोजा वाढवत आहे. येणाऱ्या काळात या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणे रंजक ठरणार आहे.