milk amount per day : जास्त दूध पिण्यानं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या दिवसभरात किती दूध पिणं बरोबर

पोलीसनामा ऑनलाइन  – दूध (milk ) आपल्यासाठी कॅल्शियम, खनिज, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, चांगले फॅट, पोटॅशियम अणि फॉस्फरसचा एक समृद्ध स्रोत आहे. सर्व वयोगटातील लोकांना दूध प्यायला हवे. इम्यूनिटी वाढवणे, वजन कमी करणे तसेच मजबूत हाडांसाठी ते आवश्यक आहे. इतक सर्व चांगले गुण असूनही दूध (milk ) नुकसानकारक ठरू शकते. कारण कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे अति प्रमाणात दूध प्यायल्याने ते हानिकार ठरते. आरोग्याचे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

अति प्रमाणात दूध (milk ) प्यायल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात ते जाणून घेवूयात…

1 पचनसंबंधी समस्या
यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. मळमळ आणि अस्वस्थता जाणवते. यामुळे पचनाच्या समस्या होतात. शरीरात काही असे एंजाइम निर्माण होतात, ज्यामुळे आतड्यांच्या समस्याही होऊ शकतात.

2 शरीर सुस्त
लीकी-गट सिंड्रोम होऊ शकतो. यामुळे थकवा, सुस्ती येऊ शकते. ए 1 कॅसीइन दूधात असते, यामुळे आतड्यांना सूज येऊ शकते.

3 त्वचेवर ब्रेकआऊट
चेहरा किंवा त्वचेच्या अन्य भागात अ‍ॅलर्जी आणि ब्रेकआऊट होऊ शकते. ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते.

4 हाडे कमजोर होतात
जास्त दूध प्यायल्याने हाडे कमजोर होतात.

5 मेंदूसंबंधी समस्या
जास्त दूध प्यायल्याने मेंदूसंबंधी समस्या होऊ शकतात. स्मरणशक्ती कमजोर होणे, एकाग्रता कमी होणे, विसरणे अशा समस्या होतात.

6 हृदयासाठी धोकादायक
मात्र, हा दावा अजून सिद्ध झालेला नाही. परंतु, बीएमजेद्वारे करण्यात आलेल्या छोट्या अभ्यासात आढळले आहे की, जे लोक जास्त दूध पितात त्यांना हृदयाची समस्या होते. तसेच महिलांमध्ये कँसर होण्याची शक्यता वाढते.

* एका दिवसात किती दूध प्यावे
तज्ज्ञांच्या मतानुसार, एक दिवसात एक ते दोन ग्लासच दूध प्यावे. पनीर, मट्ठा, दही इत्यादी स्वरूपात सुद्धा दूध घेऊ शकता.