द्रुतगती महार्गावर बोरघाटात कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीवेळा करता खोळांबली होती. ही घटना सातच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ घडली.

या घटनेमुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ कंटेनर उलटन्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थली धाव घेत क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला केला. एक तासाच्या परिश्रमानंतर कंटेनर बाजूला घेण्यात यंत्रणेला यश आले.एक तासानंतर हा कंटेनर बाजूला करण्यात आला असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागला.