धायरीत पार्क केलेली ऑडी आणि होंडा सिटी जाळली

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन
धायरी येथील रायकरनगर मध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या एका ऑडी व होंडा सिटी कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून अज्ञाताने ती पेटवून दिल्याची घटना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी हसन अब्दूल जमील शेख ( 34, रायकर नगर गल्ली नं 18) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धायरीत पार्क केलेली ऑडी आणि होंडा सिटी जाळली

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, फिर्यादी हसन अब्दूल जमील शेख हे धायरी येथील रायकर नगर परिसरातील गल्ली नं 18 मधील उज्ज्वल टेरेस येथे राहण्यास आहेत. त्यांच्या इमारातीमध्ये एक ऑडी व होंडा सिटी कार अशी दोन वाहने पार्क केली होती. त्यावेळी पहाटे दोनच्या सुमारास या दोन्ही कारला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. मात्र तोवर दोन्ही वाहने जळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोणीतरी अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ टाकून ही दोन्ही वाहने पेटवून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटिव्हीफुटेज तपासले असून त्यामध्ये अज्ञातांनी कार पेटवल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.