नक्षलवाद्यांनी घडविलेल्या आयईडी स्फोटात नऊ जवान हुतात्मा

सुकमा : वृत्तसंस्था
नक्षलवाद्यांनी घडविलेल्या शक्तिशाली आयईडी स्फोटात नऊ सीआरपीएफ जवान हुतात्मा झाले आहेत. सुकमा जिल्ह्याच्या किस्ताराम भागात नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडविला. या स्फोटात सहा जवान जखमी झाले असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुकमा जिल्ह्यातील किस्तराम इथे हा हल्ला झाला. सीआरपीएफच्या २१२ बटालियनचे जवानांकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी येथील जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे १०० नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. सुरुवातीला जवानांचं भू-सुरुंग विरोधी वाहन उडवून देण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबार झाला. त्यात आठ जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर, दहा जवान जखमी झाले. स्थानिक पोलिसांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार धूमश्चक्री सुरू असल्याचं सूत्रांकडून समजते.
आठवडाभरापूर्वी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत १० नक्षलवादी मारले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्याकडे सूड म्हणून पाहिले जात आहे.