नदी सुधार प्रकल्पाचे काम सहा महिन्यात सुरू: महापालिका आयुक्त कुणाल कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील 44 किलो मीटर लांबीच्या नदी सुधार प्रकल्पास येत्या सहा महिन्यात सुरुवात होईल., अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरातून जाणाऱ्या मुळा आणि मुठा नदीचा नदी सुधार प्रकल्पा अंतर्गत कायापालट होणार आहे. यासाठी काही पत्र व्यवहारांची पूर्तता होताच येत्या सहा महिन्यात कामाला सुरुवात होईल. या प्रकल्पाचे काम तब्बल 10 वर्षे सुरू राहणार आहे. या कामामध्ये विविध नागरिकांच्या व तज्ञांच्या सूचनांचा अंर्तभाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.