नरेंद्र मोदीच स्टार प्रचारक; भाजप कर्नाटकच्या मैदानात

नवी दिल्ली
येत्या 12 मे रोजी कर्नाटक विभासभेच्या 224 जागांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ताधारी काॅंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपल्या स्टार प्रचारकांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, सत्ताधारी राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री व पक्षाचे जेष्ठ नेते अशा 40 स्टार प्रचारकांची यादी भाजपने जाहीर केली.
 या निवडणूकीत भाजपची  मदार ही पंतप्रधान मोदी यांच्यावर आहे. त्यांच्याबरोबर डझनाच्यावर केंद्रिय मंत्री निवडणूकीच्या आखाड्यात आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश असून, त्यांच्या मार्फत भाजप सीमावर्ती भागातील मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करु पाहत आहे. या यादीमध्ये मध्ये प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्याचाही समावेश आहे. ही निवडणूक बी.एस. येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे.