काय सांगता ! होय, लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स ‘कव्हर’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास विमा (Insurance) कंपन्या इन्शूरन्स (Insurance) कव्हर देणार आहेत. देशातील काही विमा कंपन्याकडून अशा प्रकारचा विमा (Insurance ) ऑफर केला जात आहे. त्यामुळे आता पालकांची चिंता काहीही दूर होणार आहे. आजारपणात मदत व्हावी यासाठी विमा काढला जातो. विम्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान काही विमा कंपन्या एका अनोख्या परिस्थितीसाठी देखील विमा ऑफर करत आहेत.

लग्नाआधी नवरी किंवा नवरा पळून गेला, तर काही विमा कंपन्या तुमच्यासाठी इन्शूरन्स कव्हर देतात. खूप कमी लोकांना अशा प्रकारच्या विमा योजनेबद्दल माहित आहे. या पॉलिसीअंतर्गत तुम्ही लग्नासाठी केलेल्या सजावट किंवा इतर खर्चासाठी लागलेल्या पैशांसाठी संबंधित विमा कंपनीकडे दावा करू शकता. लग्नासाठी देखील अनेक कंपन्यांनी इन्शूरन्स पॉलिसी बनवली आहे.आवश्यकतेनुसार तुम्ही वेडिंग इन्शूरन्स पॉलिसीचे पॅकेज घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार या पॅकेजची निवड करता येते. या पॅकेजअंतर्गत मिळणारे अनेक लाभ तुम्हाला घेता येतात. हॉल किवा रिसॉर्टच्या अ‍ॅडव्हान्सचा खर्च असतो. यावर इन्शूरन्स मिळतो.

त्याचप्रमाणे ट्रॅव्हल एजन्सीला दिलेल्या अ‍ॅडव्हान्स पेमेंटवर, हॉटेलच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंवर, लग्नपत्रिकांचा खर्च, सजावट यावरील खर्चावर इन्शूरन्स असतो. त्यामुळे लग्न कोणत्याही कारणाने रद्द झाल्यास, तुमचे दागिने चोरी झाल्यास, अपघात झाल्यास अशा अनेक समस्यांअंतर्गत हा वेडिंग इन्शूरन्स तुमच्यासाठी आर्थिक मदतनीस म्हणून काम करणार आहे.