खळबळजनक ! पुण्यातील नवले ब्रिजजवळ तरुणाचा खून, हात-पाय बांधून मृतदेह पोत्यात टाकून दिला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले ब्रिज जवळ एका तरुणाचा खून करत त्याचे हात-पाय बांधून मृतदेह पोत्यात टाकून दिल्याचा खळबळजनक प्रकार नवले ब्रिजज वळ उघडकीस आला आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला नवले ब्रिज जवळ एका पोत्यात मृतदेह असल्याचे समजले. त्यांनी ही माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानंतर मार्शल आणि रात्र गस्तीवरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी एका पोत्यात तरुणाचा मृतदेह आढळला. त्याचा खून केल्यानंतर हात पाय दोरीने बांधून टाकल्याचे दिसून आले आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. पोलीस त्याची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.