नवी मुंबईतील ५० ते ६० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
गेल्या अनेक दिवसापासून शहरात आगीचे सत्र सुरूच आहे. नवी मुंबईतील पनवेलमध्ये ५० ते ६० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. विजेची वायर तुटून एका झोपडीवर पडल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशमन दलाला यश आले.

पनवेलमधील तक्का परिसरात बुधवारी रात्री झोपड्यांना भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. परिसरातील ५० ते ६० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. विजेची वायर तुटून एका झोपडीवर पडली आणि ही आग लागली. आगीत सिलिंडरचाही स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.