नागपूर एसीबीचा चौकार

नागपूर : आॅनलाईन पोलीसनामा
आज दिवसभरात नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेण्याच्या ४ प्रकरणात ५ जणांना पकडले.

  • वीज चोरीप्रकरणात गुन्हा दाखल करु नये म्हणून महावितरण कोंढाळीचा सहा.अभियंता कोहिनूर ताजणे यांने 20 हजाराची मागणी केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी त्याला अटक केली.
  • गोंदियाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रद्धा जयस्वाल आणि वनरक्षक डोमेंद्रसिंग परिहार यांनी लाकूड वाहतूक परवान्यासाठी चार हजार रूपयाची लाच स्विकारल्यावरुन पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांनी त्यांना अटक केली.
  • आमगांव (जि.गोंदिया) समितीचा सहा.कार्यक्रम अधिकारी रामेश्वर बिसन यांने गोठा प्रकरण मंजुरीसाठी तीन हजाराची लाच स्विकारल्यावरुन त्याला पो.उपअधीक्षक रमाकांत कोकाटे यांनी अटक केली.
  • गडचिरोली प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनील दिवसे यांने शेतजमीन वर्ग १ ची मंजूर प्रत देण्याकरिता १० हजाराची लाच स्विकारल्यावरुन पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम यांनी त्याला अटक केली आहे.
  • नागपूर एसीबी चे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात दिवसभरात या कारवाया करण्यात आल्या.