नायलॉन मांजाची विक्री करणारे दोन व्यापारी गजाआड

वाकड : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे आणि शहरामध्ये पतंगाचा नायलॉन मांजाची विक्री करणे कायद्याने बंदी असताना त्याची चोरुन विक्री होत आहे. वाकडमध्ये चोरुन मांजा विक्री करणा-या दोन व्यापा-यांना अटक करण्यात आली आहे. या व्यापा-यांकडून दीड हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी साडेचारच्या सुमारास डांगे चौकातील क्लासीक स्टेशनी या दुकानावर करण्यात आली.

रताराम रघुनाथराम सोळंकी (वय-37) आणि चम्पालाल रघुनाथराम सोळंकी (वय-34, दोघे रा. विशालनगर, वाकड रोड, पिंपळे निलख) असे अटक करण्यात आलेल्या व्यापा-यांची नावे आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई डी.व्ही. हांगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस आज दुपारी गस्त घालत असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाची चोरुन विक्री होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी डांगे चौकातील क्लासीक स्टेशनरी या दुकानावर छापा मारला. दुकानामध्ये एक हजार 215 रुपयांचा वेगवेगळा नायलॉन मांजा विक्री करता साठवून ठेवल्याचे आढळून आले.

पतंगासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा विक्री करणे आणि वापरण्यावर कायद्याने बंदी आहे. या मांजामुळे अनेक मुक्या प्राण्यांना आणि पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक पक्षी जायबंदी झाले आहेत. मध्यंतरी काळेवाडी येथे एका लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता तर पुण्यामध्ये मांजामुळे एका तरुणीला आपला जिव गमवावा लागला होता.

ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे तपासी पथकातील पोलीस उपनिरीक्षक हरीष माने यांनी केली.