नाशिक जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न, कारण अस्पष्ट

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या कायद्याचे नाव सोमनाथ दगडू शेंडे (वय: ५०) असे आहे. पँटच्या नाडीने शौचालयात गळफास घेण्याचा त्याने प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोमनाथ शेंडे याने काल रात्री पावणे आठच्या सुमारास बराक क्रमांक चारच्या शौचालयात जाऊन गळफास घेतला होता. त्याच वेळी शिक्षाबंदी हुसेन मोहम्मद पटेल हा शौचालयात गेला असता त्याने हा प्रकार बघितला. इतर कैद्यांना आणि कर्मचाऱ्यांना बोलावून सोमनाथला खाली उतरविले.
या आत्महत्येचा प्रयत्नानांचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ शेंडेचे मानसिक स्वास्थ बिघडले असून तो नेहमी तणावात असतो. याच तणावातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.