निगडीत हॉटेल मॅनेजमेंटचे अनोखे प्रदर्शन

निगडी: पोलिसनामा ऑनलाईन
निगडी येथील नोव्हेल संस्थेच्या एनआयबीआर हॉटेल व्यवस्थापनाचे आगळं वेगळं प्रदर्शन भरले आहे. विविध नाविन्यपूर्ण कल्पना करुन हे प्रदर्शन भरले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन नॉव्हेलचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य वैभव फंड, विद्यार्थी उपस्थित होते. याबाबतची महिती देताना प्राध्यापक सुखदा कुलकर्णी म्हणाल्या,’हॉटेल मॅनेजमेंट’ या विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी. त्याची गोडी लागावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले आहे. हॉटेल व्यवस्थापनांच्या ‘हाऊस किपिंग’ या विषयांतर्गत ‘हॉटेलची आतील सजावट’ कशी असेल हा विषय घेऊन यंदाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन व्यवस्थापनाच्या तिस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भरविले असून या प्रदर्शनात जेल हॉटेल, टॉयलेट हॉटेल्स, गुहेतील हॉटेल, जंगल, एरोप्लेन, चंद्रावरचं हॉटेल्स कशी असणार आहे याबाबतच प्रतिकृती आहेत. या प्रदर्शनाचे यंदा दहावे वर्ष आहे.

भविष्यात हॉटेल्स कशी असतील याचे एक उत्तम उदाहरण या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून दिले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य वापरुन ही भविष्यातील हॉटेल्स ‘व्हिअर्ड’ थीम वापरली आहे.

याबाबत बोलताना नॉव्हेल इन्स्टियूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले,”शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने येथे त्रितारांकित व पंचतारांकित टोलेजंग हॉटेल्स उभी राहत आहेत. हॉटेल मॅनेजमेंट हा प्रमुख व्यवसाय म्हणून नावारुपाला आला आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अन्नाचा दर्जा, हाऊस किपिंग, सजावट अशा विविध जबाबदा-यांचा समावेश असतो.भविष्यात अशा विविध प्रकारचे हॉटेल्स निघतील यात शंका नाही. ती हॉटेल्स कशी असतील हेच हॉटेल्स प्रदर्शनातून मांडण्यात आले आहे.