निर्भया आनंदी जिवन संस्थेच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना मदत

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

निर्भया आनंदी जिवन संस्था व सिद्धी महिला बचत गटाच्या वतीने वडगाव रोड आळंदी येथील अन्नपुर्णा आश्रमाला अन्नधान्य व कपड्याची मदत करण्यात आली. आपण समाजामध्ये जीवन जगत असताना आपले देखील समाजाप्रती काही तरी देणं आहे या भावनेतून ही मदत करण्यात आली.

याप्रसंगी निर्भया आनंदी जिवन संस्थेच्या संस्थापिका चांदणी, सिद्धी महिला बचत गटाच्या संघटिका राजश्री शिंदे, शितल सोंडकर, माधुरी बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्भया आनंदी जिवन संस्थेच्या घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून काैतूक होत आहे.

निर्भया आनंदी जिवन संस्थेच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना मदत