“न्युड” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन

रवी जाधव यांच्या न्युड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून केवळ काही तासांत चार लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.
काहीही झाले तरी आपल्या मुलाचे शिक्षण थांबू नये यासाठी धडपड करणाऱ्या एका आईची कथा न्यूड या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये नसिरुद्दीन शाह दिसत आहेत. ‘बेटा…कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’, हा त्यांचा संवाद ऐकूनच आपल्याला चित्रपटाच्या कथेबाबत अंदाज बांधता येत आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण देता यावे यासाठी एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका स्त्रीची कथा दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यूड या चित्रपटात मांडली आहे.
न्यूड हा चित्रपट २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून कोणत्याही कट्सविना हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राजश्री देशपांडेची मुख्य भूमिका असून या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे.