न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर दुर्मिळ परंतू मात देण्याजोगा आजार : डॉ. अमित भट

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने स्वतः ट्वीट करुन त्याला ‘न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर’ असल्याचे सांगितले आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. हा आजार नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी पोलिसनामाचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी कर्करोगतज्ञ डॉ. अमित भट यांच्याशी चर्चा केली.

डॉ.भट यांनी दिलेल्या माहितीनुसार न्युरोएन्डोक्राइन ट्युमर हा न्यूरो एंडोक्राइन नावाच्या पेशींच्या क्रिया आणि आकार यामध्ये अनियमितता आल्याने तसेच त्यामधे वाढ झाल्यामुळे होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयात आणि शरीरात कोठेही होऊ शकतो.

या संदर्भातील सखोल माहितीसाठी ‘न्यूरो एंडोक्राइन सिस्टिम’ या पूर्ण माहिती करुन घ्यावी लागेल. संपूर्ण शरीरामध्ये संदेश पोहोचविण्याचे कार्य ही प्रणाली करते. न्युरो एंडोक्राइन पेशींच्या करवी संप्रेरके आणि रासायनिक द्रव्य तयार होऊन संदेश पोहोचविण्याचे कार्य होत असते. ट्युमर झाल्यास या कार्यात बाधा येते आणि तसे संकेत शरीराकडून मिळतात. जसे की आवश्यक नसताना पेशी कार्यरत असणे.
यावर उपचार म्हणजे शस्त्रक्रिया असली तरी बऱ्याच रूग्णांमध्ये उशीरा म्हणजेच ट्युमरची लक्षणे दिसल्यानंतर निदान झाल्यास शस्त्रक्रियेनंतर सुद्धा बरेच दिवस औषधोपचाराची गरज असते. बऱ्याच रुणांमध्ये हा आजार बरा होऊ शकतो.