पतंगराव कदम यांना अखेरचा निरोप

वांगी : पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांना लाखो चाहत्यांनी भरल्या डोळ्याने अखेरचा निरोप दिला. वांगी येथील मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह लाखो चाहते आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

काल रात्री लीलावती उपचार सुरु असतानाच रुग्णालयात कदम यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी आणि नंतर भारती विद्यापीठ येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते .त्यानंतर त्यांच्या मूळगावी अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले होते. वांगी येथील कारखान्याच्या मैदानावर त्यांना शासकीय इतमामात भावपूर्ण वातावरणात त्यांना निरोप दिला. कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वजित कदम यांनी मुखाग्नी दिला. यावेळी मुख्यमंत्री ,मंत्री ,सर्वपक्षीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आपल्या नेत्याच्या कायमच्या जाण्याने सर्व वातावरण गहिवरून गेले होते.