पत्नी सकाळी उशिरा उठते, रुचकर जेवण बनवत नाही

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन
‘पत्नी सकाळी उशिरा उठते, रुचकर जेवण बनवत नाही आणि गृहकृत्यदक्ष नाही,’ असा आरोप करत पतीने तिच्यापासून घटस्फोट हवा असल्याची मागणी केली होती. मात्र, ‘हे आरोप क्रूरपणात मोडत नसल्याने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे’, असे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने पतीचे अपिल फेटाळून लावले.

सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या पतीची घटस्फोटाची याचिका वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली होती. त्याविरोधात पतीने केलेल्या अपिलावर निर्णय देताना न्या. के. के. तातेड व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने आदेशात हेही नमूद केले की, पत्नी स्वत: नोकरदार महिला असूनही घरातील सर्वांसाठी जेवण करण्यासह किराणा माल आणण्यासारखी अतिरिक्त कामांचा बोजा उचलते,’ त्यामुळे ती गृहकृत्यदक्ष नसल्याचा आरोप मान्य करता येणार नाही.