परळीतील मुर्तीजवळ नागाचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत

परळी: पोलीसनामा ऑनलाइन
परळी जवळील कन्हेरवाडी गावाच्या अलिकडील डोंगराचे खोदकाम दरम्यान पुरातन मुर्ती सापडली होती व त्यामूर्तीला एक नाग संरक्षण देत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. आता या व्हिडीओ मागील सत्य उघड झाले आहे. या मुर्तीवर नागाला गावातील नागरिकांनीच ठेवून लाखो लोकांसमोर अंधश्रद्धा पसरवली.
या व्हिडिओमागील सत्य म्हणजे,” परळी,अंबाजोगाई नॅशनल महामार्गाचे काम सुरू असताना त्या मातीत मुरूम,दगड, गोटे उचलन्यायाचे काम सुरू होते. हे काम कन्हेरवाडी गावाच्या जवळील एका खाजगी डोंगरात सुरू आहे.

सोमवारी खोदकाम करताना तेथे एक पुरातन डोक्यापासून कमरेपर्यतचा भाग असलेली मुर्ती सापडली होती. या मूर्तीवर कोणी तरी एक नाग ठेऊन व त्याचा व्हिडिओ करून पाठवला व हा हा म्हणता मुर्तीचे रक्षण नाग करतो अशी अफवा वेगाने पसरली. बघता,बघता त्या डोंगरावर पाहण्यासाठी रांग लागली होती.

परळीचे तहसिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली होती. खोदकाम थांबवण्याचे आदेश देऊन मुर्तीची सत्यता पडताळण्यासाठी पुरातत्व विभागाला सुचित केले होते. काल पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके हे परळी आले होते व त्यांनी ही मुर्ती सुर्य देवतेची आहे असे स्पष्ट केले होते.

या डोंगरावर मुर्ती सापडली म्हणुन ग्रामस्थ तेथे सुर्यदेवतेचे मंदिर बांधण्याच्या तयारीत होते मात्र रात्री या मुर्ती व नागाचा खरा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यात एक जण नाग काठीने उचलून त्या मुर्तीवर ठेवताना दिसत आहे. असे करण्यासाठी काही गावकरी त्याला सांगताना या व्हिडिओत दिसत आहे.

संबंधित घडामोडी:

खोदकामादरम्यान सापडलेल्या मूर्ती शेजारी नाग