परीक्षेत कॉपी करताना पकडले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
परीक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे बारा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पवईत राहणाऱ्या रिद्धीने कुर्ल्यातील सेंट मायकल या शाळेत परीक्षा दिली होती.

रिद्धी आठवीत शिकत होती. परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी हा प्रकार रिद्धीच्या पालकांना कळवला आणि घरी जाण्यास सांगितले. रिद्धीच्या आई स्वतः मुलांचे क्लास घेते. घरी आल्यानंतर रिद्धी तिच्या खोलीत गेली. रिद्धी खोलीतून बाहेर येत नसल्याचे पाहून आईने खोलीत प्रवेश केला. तेव्हा रिद्धी मृतावस्थेत आढळली.

या घटनेनंतर रिद्धीला तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस आता या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत. शिक्षकांनी रिद्धीला सर्व मुलांच्या समोर अपमानित केलं होते का, याचीही चौकशी होणार आहे.