मनोहर पर्रिकर पुढील उपचारसाठी अमेरिकेला रवाना

गोवाः पोलिसनामा आॅनलाईन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनेक दिवसांपसून पोटाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना मुंंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, पर्रिकर हे आज रात्री पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे दिली आहे. सोमवारी रात्री उशीरा ते गोव्यावरून मुंबईला लिलावती रूग्णालयात दाखल झाले त्यानंतर त्यांना पुढील आणि योग्य उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला असल्याचे सी एम अो आॅफिस गोवा यांनी मंगळवारी रात्री टि्वटरवर ट्विट करून सांगितले आहे.

15 फेब्रुवारी 2017 ला त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर 22 फेब्रुवारी ला त्यांना डिचार्ज देण्यात आला होता. पण, रूग्णालयातून लगेच ते गोव्याच्या अर्थसंकल्पीय बजेट सत्रात सहभागी झाले होते. त्यानंतर ते घरातूनच मुख्यमंत्री कार्यालयाचे काम सांभाळत होते. आता मात्र पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री पर्रिकर हे आज अमेरिकेला रवाना होणार असल्याचे ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे.