पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या बलात्कारींची भरचौकात दगडाने ठेचून हत्या

इटानगर : एका चिमुकलीवर बलात्कार करुण तिची हत्या केल्याच्या संशयावरून पोलीसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींना संतप्त जमावाने बाहेर खेचून भरचौकात ठेचून हत्या केल्याची घटना अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील तेजू गावात घडली.जगदीश लोहार (२५) अाणि संजय सोबोर (३०) असे हत्या केलेल्या झालेल्या आरोपीची नावे आहेत. दोघेजन चहाच्या मळ्यातील मजूर होते.

१२ फेब्रुवारीला आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली हाेती. १७ फेब्रुवारीला चहाच्या मळ्यात तिचा मृतदेह सापडला होता. तिचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. शरीरावर कपडे नव्हते. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपींना आसाममधून अटक केल्याची माहीती आयजी नबीन पायेंग यांनी दिली आहे. कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. यावेळी त्यांना तेजू पोलिस ठाण्यात कैदेत ठेवल्याचे कळताच ५०० ते १ हजार लोकांचा जमाव ठाण्याबाहेर जमला. पोलिस ठाण्यावर हल्ला करत त्यांनी पोलिसांना पकडून ठेवले. कोठडीतून आरोपींना सोडवून त्यांना फरपटत भरचौकात आणले.यानंतर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी जमावाने पाेलिस ठाण्यातही मोठी तोडफोड केली.