पार्किंग पॉलिसी नसून भाजपची भ्रष्टाचाराची पॉलिसी : विरोधी पक्षनेते चेतन तुपे

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील  रस्त्यावर रात्र आणि दिवसा पार्किंग पॉलिसी राबवण्याच्या विषयाला काल झालेल्या स्थायी बैठकीत सत्ताधारी भाजपने मंजुरी दिली असून या विषयाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की,पुणे महापालिकेतील सताधारी पक्षाकडून सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम पार्किंग धोरणातून करण्यात आले आहे.ही बाब निषेधार्थ असल्याचं सांगत ते पुढे म्हणाले की, याच्या विषयाला भाजप शहर अध्यक्षांचा विरोध आणि मुंबईतून फोन येतो. त्याला मंजुरी मिळते. म्हणजे यातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे.तसेच ही पार्किंग पॉलिसी म्हणजे भाजपची भ्रष्टाचाराची पॉलिसी असल्याची टीका सताधारी पक्षावर त्यांनी केली.