पार्कींग पाॅलिसी विरोधात विविध संघटना व पक्षांची पालिका भवनासमोर निदर्शने

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन
वादग्रस्त ठरलेल्या पार्कींग पाॅलिसीला विरोध करण्यासाठी महापालिका भवनासमोर दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत निदर्शने झाली. संभाजी ब्रिगेड, हमारी अपनी पार्टी, भीम आर्मी आदी सहभागी झाले होते. भवनासमोर बग्गी, बैलगाड्या उभ्या केल्या होत्या. त्यामुळे आंदोलने लक्षवेधी झाली.

हमारी अपनी पार्टीच्यावतीने कार्यकर्त्यांनी पालिका सभागृहासमोरच बैठक ठोकून मनमानीला कारभाराच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.जाचक प्रस्ताव आणून पुणेकरांना मनस्ताप दिल्याबद्दल महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवनकुमार गुप्ता आणि शहराध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी केली.