पिंपरीत कंटेनर ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा अॉनलाईन 

पिंपरी-चिंचवड मधील निगडी कडून पुण्याच्या दिशेने  जाणाऱ्या मार्गावर ग्रेड सेपरेटर मध्ये कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.आज सकाळी पहाटे हा मालवाहू कंटेनर या मार्गात अडला त्यामुळे पुण्यात कामाला जाणाऱ्या नोकरदारांना याचा फटका बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

अधिक माहिती अशी की,एन एल-०१ ए.ए-९७८३ या नंबर चा मालवाहू कंटेनर हा पिंपरी च्या अहिल्या बाई चौकातील ग्रेड सेपरेटर मध्ये आज पहाटे अडकला होता,तो अद्यापही काढण्यात आला नाही.यामुळे ग्रेडसेपरेट तसेच पिंपरी आंबेडकर चौक,अहिल्याबाई चौक येथे सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांनी दमछाक झाली.सद्य स्थितीला क्रेनने कंटेनर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.वाहन चालक पळून गेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील सांगितले. पिंपरी चौक आणि अहिल्याबाई होळकर चौक येथे नेहमी अश्या घटना घडतात याचा मनस्ताप वाहतूक चालकांना होतो.वाहतूक पोलिसांनी योग्य वेळी कठोर पाउल उचलली तर ही वेळ येणार नाही.

वाहतूक पोलीस निरीक्षक निंबाळकर म्हणाले की,मालवाहू कंटेनर काढण्याचे काम सुरू आहे.काही वेळातच क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेतला जाईल.अश्या प्रकारच्या घटनेत वाहनचालकावर नेहमीच कारवाई करतो.