पुणे महापालिकाआयुक्त कुणाल कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार सोडला

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज दुपारी आयुक्तपदाचा पदभार सोडला आहे. आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दुसरे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे उद्यापासून ट्रेनिंगसाठी मसुरीला जाणार आहेत. त्यांचा कार्यभार ही उगले यांच्याकडे देण्यात येणार आहे. राज्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या परवानगी नंतर कुमार यांनी आज पदभार सोडला अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

सौरभ राव यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे राज्य शासनाने अद्याप त्यांच्या ही बदलीचा निर्णय घेतला नाही.