पुणे शहर आणि परिसरात 35 दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे शहर आणि परिसरात 35 दुचाकी चोरणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 18 गुन्हे उघडकीस आले आहे.अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डाहणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सहायक पोलीस आयुक्त समीर शेख हे देखील उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपायुक्त पंकज डाहणे म्हणाले की,दोन दिवसांपूर्वी सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, भोसरी आणि पिंपरी या भागातील दुचाकी वाहने चोरी करणारा तरुण भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुला जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर येणार आहे. त्यानुसार सापळा रचण्यात आला .त्याच दरम्यान त्या ठिकाणी सचिन बळीराम साळूखे वय 32 रा.बल्लूत आळी चाकण आला.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता.त्याने पुणे आणि परिसरात 35 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.तर तो 5 ते 10 हजार रुपयांना त्या दुचाकी लातूरसह इतर ठिकाणी विक्री करित असत.पुण्यात 18 गुन्हे उघडकीस आले असून पिंपरी चिंचवड 13,भोसरी 2,एमआयडीसी आणि भोसरी 2,निगडी 1 अशी एकूण पुण्यात 18 गुन्हे केल्याचे समोर आले आहे.तर पुणे ग्रामीण भागात खेड 4,शिक्रापूर 3,मंचर 1 अशी मिळवून 8 गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली.त्याच प्रमाणे या दुचाकी विकत घेणाऱ्या 5 व्यक्तीना देखील आरोपी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच अजून काही दुचाकी विकत घेणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहा. पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे प्रॉपर्टी सेलचे पोलीस निरीक्षक एस.व्ही.शिंदे,पोलीस फौजदार इजाज शिलेदार,पोलीस हवालदार अनिल उसुलकर,यशवंत खंदारे,झुंजुरके,अनिल शिंदे,तांबोळी,सुधीर मनोळकर, संजय जगताप,संजय सुर्वे, अमोल भोसले,तुकाराम नाळे, दिनेश भुजबळ आणि संजय ढोले यांनी कारवाई केली.