पुणे स्टेशनवरुन बाळ पळवणा-या महिलेसह बाळ पोलिसांच्या ताब्यात

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन

कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या एका जोडप्याचे आठ महिन्यांचे बाळ एका अनोळखी महिलेने पळवले होते. या बाळाचा आणि महिलेचा शोध लागला असून चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथून या महिलेला बाळासह ताब्यात घेण्यात आले आहे. हि कारवाई क्राईम ब्रँच आणि खडणी विरोधी पथकाने केली.

पुणे रेल्वे स्थानकावरुन सोमवारी (दि.5) रात्री दहाच्या सुमारास एका अनोळखी महिलेने आठ महिन्याचे बाळ पळवल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या महिलेचा शोध घेत असताना पोलिसांना महिला आणि बाळ वाल्हेकरवाडी येथे असल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करुन आज (सोमवार) रात्री साडे आठच्या सुमारास महिलेला बाळासह ताब्यात घेतले असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

ही महिला वारजे येथील शिवणे येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली. तिच्या बरोबर असणाऱ्या पुरूषाचा शोध घेऊन, त्यानतंर या महिलाचा माग काढण्यात आला असल्याचेही सुत्रांनी सांगितले.