पुण्याच्या दिशेने येणारी व्होलवो बस उलटली

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई वरून पुण्याच्या दिशेने येणारी व्हॉल्व्हो बस पनवेल जवळ उलटली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमीला MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची बस प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने येत होती. पनवेलजवळ द्रुतगती मार्ग सुरू होतो त्या ठिकाणी ही बस उलटली. या अपघातामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक काही वेळकरिता थांबवण्यात आली होती.