पुण्यातील डॉ. कोयाजी रस्त्यावर वृद्धाचा खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
कँप परिसरातील डॉ. कोयाजी रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका ६५ वर्षाच्या वृद्धाला सीमेंट ब्लॉकने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही.
याप्रकरणी सागर बाबूराव वाघमारे (२५, सर्व्हर्स क्वार्टर,) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर वाघमारे हे पोलिस उप आयुक्त साहेबराव पाटील यांच्या कोयाजी रस्त्यावरील सरकारी निवासस्थानात सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीस काम करत होते. या सरकारी निवासाच्या जवळच एक व्यक्ती डॉ़. कोयाजी रस्त्याच्या कडेला तंबूमध्ये राहात होता. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी त्या पासष्ठ वर्षीय व्यक्तीला सीमेंट ब्लॉकने जबर मारहाण करत गंभीर जखमी केले आणि पसार झाले. त्यानंतर वाघमारे यांनी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) तपास करीत आहेत.