पुण्यात पाच वर्षात ३२ हजार कोटीची कामे होणार : आयुक्त कुणाल कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने येत्या पाच वर्षाच्या काळात मेट्रो,नदी सुधार या सारखे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहे.या माध्यमातून तब्बल ३२ हजार कोटीची कामे केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापाप्रसंगी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापास जिल्हाधिकारी सौरभ राव,महापालिका आयुक्त कुणाल कुमार,पीएमआरडीए चे आयुक्त किरण गित्ते यांनी पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा यावर मार्गदर्शन केले.यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणीस दिगंबर दराडे आदी उपस्थित होते.

यावेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की,सद्य स्थितीला पुणे शहर प्रगतीपथावर असून मागील दहा वर्षात जेवढी कामे झाली नाहीत.तेवढी येत्या पाच वर्षात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच शहरातीला काही वर्षांपासून कचरा समस्येने ग्रासले असून त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात महापालिका आणि पीएमआरडीए संयुक्त शहरातील विविध भागात कचरा प्रकल्प उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.