पॅराकमांडोच्या सरावावेळी पॅराशूटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक जवान जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील दक्षिण सदन कमांडच्या १२४ व्या वर्धापनदिनानिमित्त पॅराकमांडोचे जवान सराव करत होते. त्यावेळी विमानातून उडी मारताना एका जवानाच्या पॅराशूटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो जवान खाली पडला. या घटनेत जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील कॅम्प जवळील दक्षिण सदन कमांडच्या १२४ व्या वर्धापन दिनानिमित्त पॅराकमांडोचे जवान आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सराव करीत होते. त्यावेळी विमानातून सहा जवानांनी उडी घेतली. त्यातील सहा जणांपैकी एका जवानाच्या पॅराशूटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. पॅराशूट उघडले गेले नसल्याने तो जवान थेट खाली कोसळला असून या घटनेत तो जवान जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर या घटनेमुळे उपस्थित असलेल्या सर्वामध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहावयास मिळाले.