पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचा मोर्चा

पोलीसनामा ऑनलाईन :
पुणे : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाकडून बैलगाडीवर दुचाकी ठेवून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या मोर्चामध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,पुणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे,नगरसेवक अविनाश बागवे तसेच आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते.यावेळी शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की,“केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी होऊन गेला. मात्र या चार वर्षाच्या कालावधीत सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचा एक निर्णय या सरकारने घेतला नाही. हे पेट्रोल डिझेल मध्ये वारंवार दरवाढ करून या सरकारने सिद्ध केले आहे. या सरकारच्या उद्योगपती धार्जिण निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असून जर येत्या काळात पेट्रोल डिझेल वरील दरवाढ मागे न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाईल,” असा इशारा देखील त्यांनी दिला.