पॉर्नमुळे संसाराची वाताहत

मुंबई : ”पॉर्नमुळे माझं वैवाहिक आयुष्य पूर्णपणे वाताहत केली आहे. त्यामुळे भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी आणावी,” अशी मागणी मुंबईतील 27 वर्षीय विवाहितेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

‘माझ्या 35 वर्षीय पतीला ऑनलाईन पॉर्नोग्राफीची सवय जडली आहे. दिवसातला बराचसा वेळ तो पॉर्न साईट्सवर ब्राऊजिंग करण्यात घालवतो. त्यामुळे माझ्या वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आणावी.’ असे तरुणीने न्यायालयाला सांगितले.

आपला पती फँटसीमध्ये रममाण झालेला असतो. त्याचं ना संसाराकडे लक्ष आहे, ना माझ्या शारीरिक गरजांकडे. उत्साह नसल्यामुळे दैनंदिन कामेही तो व्यवस्थित करत नाही. आपल्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा दावाही तिने केला आहे.

‘तो पूर्णपणे पॉर्न अॅडिक्ट आहे. पौरुषत्वाच्या कमतरतेमुळे शारीरिक संबंधांसाठीही तो पुढाकार घेत नाही. त्याच्या अॅबनॉर्मल वागण्यामुळे माझा संसार धुळीला मिळाला आहे’,’असं तरुणीने याचिकेत म्हटले आहे. पॉर्न सहज उपलब्ध होत असल्यामुळे भारतात सेक्सविषयक गुन्हे आणि वैवाहिक वादांमध्ये वाढ झाल्याचेही ती म्हणते.