पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करुन युवकाची आत्महत्या

शिक्रापुर  : पोलीसनामा ऑनलाइन

पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करुन तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिक्रापुर येथे घडली आहे.
नवनाथ बबन वरखडे असे या तरुणाच नाव असून तो फुटाणवाडी पाबळ येथे राहणारा होता. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची छेड़ काढली म्हणून नवनाथ वरखडे याला पोलिसांनी ताब्यात घेउन मारहाण केली होती. पण पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याच्या नैराश्यातून तरुणाने विषारी औषध प्राशन करु आत्महत्या केली.

दरम्यान, पोलीस कर्मचारी दोषी आढल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करु, असे पोलीस अधीक्षक   सुवेझ हक यांनी सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटना स्थळी भेट दिली आहे.