पोलीसनामाच्या बातमीचा दणका

फिनिक्स मार्केट सिटी माॅलचा खुलासा

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

सोनाली नावाच्या तृतीयपंथीला 16 मार्च रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पुण्यातील नामांकित फिनिक्स माॅल सिटीमध्ये केवळ तृतीयपंथीय आहे म्हणून प्रवेश नाकारण्यात आला होता. या संदर्भातील प्रथम वृत्त ‘पोलीसनामा’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर समाजामध्ये माॅल प्रशासनाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मॉल प्रशासनाच्या वतीने आज मॉलचे जनरल व्यवस्थापक दितीमन कबाडे यांनी खुलासा दिला आहे. त्या दिवशी सुरक्षा रक्षकाकडून चुकून सोनाली यांना प्रवेश नाकारण्यात आला. या बद्दल दिलगिरी व्यक्त करीत असून यापुढे कोणालाही प्रवेश नाकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

इतर देशात तृतीयपंथी सहजपणे जनसामान्यात मिसळून सार्वजनिक ठिकाणी नोकरी करतात व तेथील समाजात एकरुप झाले आहेत मात्र भारतात अद्याप ही तृतीयपंथीयांना दुय्यम वागणूक मिळते ही दुदैवाची गोष्ट आहे.

तृतीयपंथी असल्याने मॉल मध्ये प्रवेश नाकारला

पहा व्हिडीआे- https://youtu.be/uSTAxS1_jzk

वाचा सविस्तरhttps://goo.gl/7LhN9a