प्रफुल्‍लच्या मृत्युप्रकरणी महापालिकेच्या ठेकेदारासह चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
तरण तलावात पोहण्यास गेलेल्या प्रफुल्‍ल भीमराव वानखेडेच्या (वय:21,रा.घर नं 22, म्हात्रे पुलाजवळ, दत्तवाडी) मृत्युप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी ठेकेदारासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोहण्यास गेलेल्या प्रफुल्‍लचा दि. 8 एप्रिल रोजी तळजाई टेकडीवरील पुणे महानगर पालिकेच्या क्रीडा संकुलमधील तारण तलावात बुडून मृत्यु झाला होता. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर.एस. सरडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनपा ठेकेदार मंगेश तुकाराम करंजकर (रा. संतोषनगर, कात्रज), प्रतीक कैची (22,रा धनकवडी, पुणे), सचिन वाघमारे (24, रा आंबेगाव पठार, पुणे) आणि योगेश थाटकर (22, रा पंढरपूर, दौड, जि पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्‍ल हा रविवारी (८ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी तळजाई टेकडीवरल पुणे मनपाच्या क्रीडा संकुलमधील तरण तलावात गेला होता. त्यावेळी जलतरण व्यवस्थापनाने त्याची पोहण्याची चाचणी न घेता, त्यास पोचण्यास आत सोडले तसेच जलतरण तलावामध्ये प्रथम उपचाराचे व सुरक्षात्मक साधने ठेवली नाहीत. त्यावेळी स्विमिंग टॅन्कच्या जवळ जीवरक्षक व शिपयार्ड थांबले नव्हते. आरोपींनी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्यामुळे प्रफुल्‍लचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदार मंगेश करंजकर आणि इतर तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सी.एम. मोरे करीत आहेत.

संबंधित घडामोडी:

पुण्यातील तरुणाचा स्विमिंगपूल मध्ये बुडून मृत्यू